|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
राम कृष्ण हरी !
सकाळ पासून पाहतोय घरात रेलचेल चालू आहे मोदक काय लाडू काय करंजी मिठाई काही कमीच नाही पदार्थंची ...तेव्हा समझल अरे हो आज गौरी पूजन म्हणतल थोडस गौरि विषयी माझ्या तुमच्या माउलींच्या सर्वांच्या लाडक्या मुक्ताई आदिशक्ती विषयी थोडस सांगाव ..
आज गौरी आवाहान ....आणि आपण पाहतोय माउली आणि गणपती !
गणपती म्हंटला कि गौरि माता ह्या आल्याच मग म्हणतल गौरी अर्थातच योगमायेचा अवतार नाही का मग थोड माझ्या गौरी मातेच जाणून घेऊ त्या म्हणजेच मुक्ताई !
माउलींच्या जीवनातील एक अत्यंत प्रेमळ व्यकती त्या म्हणजे मुक्ताई ....हो आपण आज याच मुक्ताई संदर्भात जाणून घेणार आहोत .तो असा कि ,
ज्या शक्तीचा अवतार मुक्ताबाई रूपाने झाला , तिचे वर्णन श्रीमदभागवतात दह्व्या स्कंदात योगमायेच्या रूपाने केले आहे . जिला दुर्गा , भद्रकाली , विजया , वैष्णवी , कुमुद , चंडिका , कृष्ण , माधवी , कन्यका , माया , नारायणी , ईशानी , शारदा व अंबिका अशी महाविष्णूने चौदा नवे दिली आहेत , त्या योगमायेचाच 'अवतार ' माझ्या श्री मुक्ताबाई आहेत . हि तिन्ही देवांची जननी आहे , असे श्री . निळोबाराय म्हणतात -
"मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी | आद्यत्रय जननी देवाचिया "
याचा रथ असा मायेच्या सत्वगुणापासून विष्णू झाला व राजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तामोगुणा पासून शंकर झाले . ''मायोपाधी शिव बोलिजेती " असे अभंगात म्हटले आहे .
shiv तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही |
सोपान तो ब्र्ह्मा मुळमाया मुक्ताई ||
हे चित्कळाचि अमुते दिसते कुमारी |
जिच्या प्रभेसी तुळणा ण पावे तमारी || (- निरंजन माधव )
मुक्ती मुक्त उघडी जगदीश लीला ||
दावावया प्रगटली भुवनैकलीला ||
आदि शक्ती मुक्ताबाई | सासी जनी लागे पायी || ( जनाबाई अभंग गाथा )
"मुख्ताख्या ब्रह्म चित्कला " याप्रमाणे मुळमाया म्हणा , आदिशक्ती म्हणा , किवा सद्रूप , चिद्रूप , आनंदरूप जे ब्रह्म त्यांपैकी चिद्रूप म्हणजे चित्कला तोच मुक्ताईनच " "अवतार " आहे .
सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया | आनंद पदी जया म्हणती हरी ||१||
अवतार शब्दाचे विवरण - तृ - धातूचे अव उपसर्गपूर्वक अवतार बनले आहे . - तृ - तरती = म्हणजे तरणे तृ या धातूस आव हा उपसर्ग लागला असता अवतरीत असे होते व अवतरीत म्हणजे खाली उतरतो , यावरून येणाऱ्यांचा अवतार असतो . श्री तुकोबाराय म्हणतात -
आम्ही वैकुंठवासी | आलो याची कारणासी ||
वैकुंठा तून खाली आले आहेत , तसेच हि भावंडे हि अवतारी आहेत .
" येथे उपकारासाठी | आले घर ज्या वैकुंठी ||
ब्रह्ममूर्ती संत जागी अवतरले | उध्दरावया आले दिन जना ||"
असे या भावंडाचे वर्णन केले आहे .
हि चारी भावंडे अवतारी असली तरी देवाचा अवतार आहेत कि , संताचा अवतार आहेत ? म्हणजे हे पूर्वजन्मात संत होते कि योगभ्रष्ट होते कि ,सिद्धयोगी कि , युंजान योगी होते ? याचा विचार केला असता हे वरील कोणत्याही कोटीत न बसता प्रत्यक्ष ईश्वराचाच "अवतार'' आहेत ..इतकच मला या प्रसंगी सांगयचं होत ..
सदरहू माहिती करिता अनमोल सहकार्य ते म्हणजे प.पू. श्री निवृत्ती महराज वक्ते त्यानाही वंदन ...
लवकरच येतोय घेऊन नवीन काही उदा : कोण कुणाचा अवतार ?
सध्या तरी इथेच जय हरी .
आपला ,
अक्षय भोसले
८४५१८२२७७२

No comments:
Post a Comment