Wednesday, 7 March 2012

आयुष्याच्या वाटेवर......

आयुष्याच्या वाटेवर,
मी आता मागे वळून पहात नाही ,
कारण मागे वळून पहाण्यासारखे,
खरंच काही उरले नाही...

स्वप्नात काय , मी वास्तवातसुध्दा फक्त तुझ्याचसाठी जगलो ,
तुलाच माझे अस्तित्व मानता-मानता माझ्या आयुष्यातुन मीच हरवलो...

नेहमी हे असेच होते
वेळ निघुन गेल्यावर मन भानावर येते ,
बोलायचे तेव्हा बोलणे होत नाही...
नी ती गेल्यावर डोळ्यातून रडू कोसलन थांबत नाही...!

No comments:

Post a Comment