Saturday, 10 March 2012

शिवजयंती
माझ्या राजाचा उत्सव आज आलाग भरात
इंग्रजी नांदते घरात मराठी राबते दारात ..
माझ्या शिवबाचा आज चालतो जन्मोत्सव
तारीख की तिथि खरी ह्यांच्यातुन जाईना विस्तव ...
पुन्हा एकदा पावल चिमुकली वळतात इथे ...
हाता घेवुनी मशाली पोर पळतात तिथे ...
ढोल ताशांचा गजर ..निघे भगव्याची दिंडी ...???
गेला फाशीवर मराठी शेतकरी ...मराठी खासदारांनी घासली दिल्लीत भांडी !!!
जीवा शिवाची कैसी झाली ही ताटातुट..
मराथ्यानिच केली इथे मराठीची लुट..
शिवा तुझ्या नावासाठी लढतात इथे दोन सेना !!
मराठ्यांच्या नगरीत झाली मराठीची दैना ...
पाहून हाल सारे तलपायांची आग नाही कुणाच्या मस्तकात भिड़त..
मराठी साठी नाही कुणी मंत्री दिल्लीत दरबारी लढत !!!
शिवबांच्या नावावर सत्ता भोगून गेल्या कित्तेक सेना...
राजांची भवानी तलवार नाही कशी कुणा अजुन गवसेना ????
"हर हर महादेव "ही ललकार आता निघेना
एकही मराठा मंत्री भगव्या हिन्दवी स्वराज्यासाठी आता जगेना !!!
शिवा तुझ्या स्मारकाला दिली त्यांनी सागरात रे जागा ...
मराठ्यांच्या भूमीवर साहेबांच्या रेसकोर्सच्या घोडयाचा पागा ..
सत्तेत येण्या आधी गेल्यावेळी ३०% महिला आरक्षणाचा बोलबाला ..
लोकसभेच्या प्रचाराला नाचून गेल्या बारबाला
शिवा आज तुझी पुन्हा एकदा जयंती
नको होऊ रे नाराज आम्हा मावल्यांवर आज
दिली रे आम्ही वर्गणी त्यांना
पिवून दारु ते घालतात मिरवनुकीत तुझ्या माज
डोक्यातला भगवा फेटा आता विश्रांतीला गेला
सूटाबुटात रे मराठा मिरवणुकीत सामिल झाला
अफजलखानाची कबर रोज सायंकाळी फुलानी सजते..
माझी रांगडी मराठी संस्कृति द-याखो-यात निजते..
"श्वास " मधून फडकला झेंडा काल ऑस्कर वारीत..
आम्ही घेतली शपथ मराठीची रोऊ पताका ह्या नेटच्या नगरीत ..
कवी ग्रीष्म आज शिवबा तुला करितो वंदन ..
असाच फुलू दे माझ्या शब्दात तुझ्या कीर्तीचे नंदन ॥

No comments:

Post a Comment