Saturday, 10 March 2012

"शिवजयंती"

एक NRI मराठी मुलगा ज्याला शिवाजी फक्त आईवडिल यांकडून ऐकून माहिती आहेत, त्यांची चित्रे पुतले बघितले आहेत पण खरा इतिहास किंवा त्यांचे चरित्र नीट माहीत नाही अशा मुलाच्या स्वप्नात शिवराय येतात तेव्हा तो त्यांना विचारतो - "कोण तुम्ही?"
शिवराय उत्तर्तात -
"माय भवानीचा वास मी
मावल्यांचा श्वास मी
माँ-साहेबांची आस मी
आई-बहिनिंचा विश्वास मी
स्वराज्याचा ध्यास मी
मोगलांचा मृत्युभास मी
मोगल भयाचा ह्रास मी
इंग्रजांचा उपवास मी
फितुरांचा फास मी
न्यायाचा सुवास मी
प्रयत्नांची कास मी
गरिबंची धनरास मी
मराठ्यांची आरास मी
दूरदृष्टिचा प्रवास मी
आज एक इतिहास मी
तरी चिरंतर खास मी"

No comments:

Post a Comment