Saturday, 10 March 2012

"शिवजयंती"

विजापुरच्या दरबारी की दरबारी

सभा बैसली सरदारी की सरदारी

आला शहाजी सरदार की सरदार शिरी

पगडी किन्कनिदार की किन्कनिदार

लव लवुनी मुजरा करी की मुजरा करी

बाळ शिवाजी तो शेजारी की तो शेजारी

बाळ शिवाजी बापा बोले की बापा बोले

धनि कसले हे अपुले की हे अपुले

किती जणांना त्रसियाले की त्रसियाले

गायी ब्राह्मण गान्जियाले की गान्जियाले

नाही मुजरा मी करणार की करणार

नाही इथे मी बसणार की बसणार

ऐसा शिवाजी होता मानी की होता मानी

कीर्ति गाजवली त्रिभुवनी की त्रिभुवनी

No comments:

Post a Comment